पंतप्रधान मोदी ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते !

जो बायडेन आणि बोरिस जॉन्सन यांना टाकलं मागे

नवी दिल्ली : देशातील कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवड झाली आहे. अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म ‘द मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता रेटिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह जगातील १३ राष्ट्रप्रमुखांना मागे टाकले आहे.

सर्वेक्षणात पीएम मोदींचे अप्रूव्हल रेटिंग ७१ % आहे. १३ ते १९ जानेवारी दरम्यान झालेल्या या सर्वेक्षणात भारताचे पंतप्रधान जगातील अनेक राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या तुलनेत खूप पुढे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकप्रियतेच्या आलेखात मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रे मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी, जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना मागे टाकले आहे. या सर्वेक्षणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सहाव्या तर ब्रिटनचे पंतप्रधान १३ व्या क्रमांकावर आहेत.

अशी आहे जागतिक टक्केवारी !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी – ७१ टक्के
मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर – ६६ टक्के
इटलीच्या पंतप्रधान मारिया द्राघी – ६० टक्के
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा – ४८ टक्के
जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ – ४४ टक्के
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन – ४३ टक्के
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो – ४२ टक्के
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन – ४१ टक्के
स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ – ४० टक्के
कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-ए – ४० टक्के

अमेरिकन डेटा इंटेलिजेंस फर्म द मॉर्निंग कन्सल्ट प्रत्येक देशातील प्रौढांचे सर्वेक्षण करून ही क्रमवारी तयार करते. नोव्हेंबर मध्ये झालेल्या शेवटच्या सर्वेक्षणातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सर्वाधिक होती. त्यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रिय ठरले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3835

Leave a Reply

error: Content is protected !!