वडाचापाट सोसायटीवर भाजपचा एकहाती विजय ; सत्ताधारी शिवसेनेचा धुव्वा
सोसायटीच्या १३ ही जागांवर भाजपचे पॅनल विजयी ; विद्यमान चेअरमनांसह शिवसेनेचे संपूर्ण पॅनल पराभूत
मालवण : मालवण तालुक्यातील वडाचापाट विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनलने १३ पैकी १३ जागा जिंकून सोसायटीवर एकहाती विजय मिळवला आहे.
या सोसायटीवर पॅनलप्रमुख राजेंद्र प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पुरस्कुत शेतकरी सहकार पॅनलने विजय प्राप्त केला आहे. शेतकरी सहकारी पॅनल मधून राजेंद्र प्रभुदेसाई, एकनाथ पाटकर, महेंद्र हडकर, अभिमन्यु पालव, बाबुराव चिरमुले, प्रकाश चिरमुले, नामदेव वरक, स्मिता पालव, भानुदय कासले, श्रीनिवास हडकर, विजय घाडीगावकर, आनंदी पाटकर, विद्याधर तातोबा पाटकर आदी उमेदवारानी शिवसेना पुरस्कुत पॅनलचा एकतर्फी पराभव करत विजय संपादन केला.
या निवडणुकीत शिवसेना पुरस्कुत पॅनलचे प्रमुख तथा विदयमान चेअरमन सतीश पालव यांच्यासहीत सर्व उमेदवार पराभूत झाले. या निवडणुकीत दत्ता सामंत, बाबा परब, धोंडी चिंदरकर, अनिल कांदळकर, अशोक सावंत, सुभाष लाड, साबाजी गावडे, सोमनाथ पानवलकर, रिता वायगंणकर, शरद मांजरेकर, विरेश पवार, बिजेंद्र गावडे, आप्पा घाडीगावकर यांनी विशेष सहकार्य केले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन अजय हिर्लेकर यांनी काम पाहिले. सर्व विजयी उमेदवाराचे भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, उपसभापती राजु परूळेकर, मठबुद्रुक संस्थेचे चेअरमन अशोक कांदळकर, दया देसाई, अनिल देसाई, सचिन पाताडे यांनी अभिनंदन केले.