हसन मुश्रीफांचा मुक्काम आता “विजयदुर्गवर”….!

कुणाल मांजरेकर

राज्यातील ऐतिहासिक गड- किल्ल्यांच्या वारशांचे जतन व्हावे आणि त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने राज्य शासनाने मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना गड किल्ल्यांची नावे दिली आहेत. त्यानुसार युवासेना प्रमुख तथा पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे निवासस्थान “रायगड” तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान “विजयदुर्ग” नावाने ओळखले जाणार आहे.

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात मागणी केली होती. त्याची राज्य शासनाने दखल घेऊन मंत्र्यांच्या निवासस्थानांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे.पालकमंत्री उदय सामंत यांचं शासकीय निवासस्थान ब-2 चे “रत्नसिंधु” असे नामकरण झाले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याचे नामकरण “शिवगड”, दादा भुसेंच्या बंगल्याचं नाव “राजगड”, के. सी. पाडवी यांच्या बंगल्याचे नाव “प्रतापगड”, विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्याचे नाव “सिंहगड”, अमित देशमुख यांच्या बंगल्याचे नाव “जंजिरा”, वर्षा गायकवाड यांच्या बंगल्याचे नाव “पावनगड”, यशोमती ठाकूर यांच्या बंगल्याचे नाव “सिद्धगड”, सुनील केदार यांच्या बंगल्याचे नाव “पन्हाळगड”, गुलाबराव पाटील यांच्या बंगल्याचे नाव “सुवर्णगड”, संदीपान भुमरे यांच्या बंगल्याचे नाव “ब्रह्मगिरी”, अनिल परब यांच्या बंगल्याचे नाव “अजिंक्यतारा” तर बाळासाहेब पाटील यांच्या बंगल्याचे नाव “प्रचितगड” ठेवण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!