नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्या वरील चाकू हल्ल्या प्रकरणात आ. नितेश राणे यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावर दोन्ही बाजूनी आज युक्तिवाद करण्यात आला. याबाबत पुढील सुनावणी उद्या २९ डिसेंबर रोजी दुपारी होणार आहे.

या अटकपूर्व जामिनावर सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत सुनावणी झाली. नितेश राणेंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. मात्र सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण न झाल्यामुळे उर्वरित सुनावणी उद्या २९ डिसेंबर रोजी दुपारी झाल्यानंतर जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे अटकपूर्व जामीनाबाबत निर्णय देणार आहेत.

सरकारी पक्षातर्फे वकील प्रदीप घरत, वकील भूषण साळवी यांनी काम पाहिले. तर नितेश राणेंवतीने ऍड. संग्राम देसाई, ऍड. राजेंद्र रावराणे, ऍड. उमेश सावंत, ऍड राजेश परुळेकर, ऍड अविनाश परब, ऍड प्रणिता पोटकर यांनी युक्तिवाद केला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!