…. तर त्याचे पडसाद सिंधुदुर्गात उमटतील ; धोंडू चिंदरकरांचा इशारा

कुणाल मांजरेकर

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील पराभव समोर दिसत असल्याने सत्तारूढ महाविकास आघाडी कडून सुडाचे राजकारण करून आमदार नितेश राणे यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या कुटील कारस्थानातून आ. राणेंना अडकवण्याचा प्रयत्न झाल्यास संपूर्ण सिंधुदुर्गात त्याचे पडसाद उमटतील आणि त्याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची राहील, असा इशारा भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर दहशतवादाचा नसलेला मुद्दा तयार करून भावनेच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात, या भ्रमात असलेले आघाडीचे नेते कूटकारस्थान करण्यात मग्न आहेत. जिल्हा बँक आपल्याला जिंकता येणार असं वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तेचा वापर करून जिंकण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, तो सुद्धा आम्ही हाणून पाडणार आहोत. परंतु आमदार नितेश राणेंच्या अटकेचा प्रयत्न झाला तर आम्हीही लोकशाही मार्गाने विरोध केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा धोंडू चिंदरकर यांनी दिला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!