वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणूकीत ८१.८६ टक्के मतदान

वैभववाडी : वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत ८१.८६ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले. १७ पैकी १३ जागांवर निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ३७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सर्व केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. मतदानानिमित्त सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


प्रभाग निहाय मतदान पुढील प्रमाणे – प्रभाग क्र. १ एकूण मतदान १३०, झालेले मतदान ९९, प्रभाग क्र. २ एकूण मतदान ८३, झालेले मतदान ५३, प्रभाग क्र. ४ एकूण मतदान ८७, झालेले मतदान ८०, प्रभाग क्र. ६ एकूण मतदान १३४, झालेले मतदान १०५, प्रभाग क्र. ७ एकूण मतदान ९०, झालेले मतदान ७१, प्रभाग क्र. ८ एकूण मतदान ११३, झालेले मतदान १०३, प्रभाग क्र. ९ एकूण मतदान १०५, झालेले मतदान ८३, प्रभाग क्र. १० एकूण मतदान १२० झालेले मतदान १०८, प्रभाग क्र. ११ एकूण मतदान १३८, झालेले मतदान ९२, प्रभाग क्र. १२ एकूण मतदान ९५, झालेले मतदान ८७, प्रभाग क्र. १३ एकूण मतदान ८५, झालेले मतदान ७६, प्रभाग क्र. १४ एकूण मतदान ११४, झालेले मतदान ९८, प्रभाग क्र. १७ एकूण मतदान ९०, झालेले मतदान ७८ इतके झाले आहे. सर्वात जास्त मतदान प्रभाग क्रमांक ४ या ठिकाणी झाले आहे. तर सर्वात कमी मतदान प्रभाग क्रमांक २ याठिकाणी झाले आहे.


सकाळी मतदान सुरू होताच राजकीय पक्षांनी बुथवर गर्दी केली होती. तालुका स्कूल, अर्जुन रावराणे विद्यालय, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, सा. बां. कार्यालय, वि.मं. वाभवे प्रशाला या ठिकाणी मतदान केंद्र निश्चित करण्यात आली होती. प्रत्येक केंद्रावर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच संभाजी चौक ते तहसील कार्यालय परिसरात पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दादासाहेब गीते, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरज कांबळे यांनी काम पाहिले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!