अनधिकृत वाळू वाहतुकीवर महसूलची कारवाई ; डंपर ताब्यात
मालवण : मसुरे स्टेट बँक समोरील रस्त्यावर अनधिकृत वाळूने भरलेला डंपर क्रमांक (क्र. एम. एच. ०७ सी-६२६६) मसुरेचे मंडळ अधिकारी एस. आर. चव्हाण यांनी पकडला. हा डंपर ताब्यात घेण्यात आला आहे. दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्याने ही कारवाई करण्यात आली.
डंपर मालक किर्तिराज मुणगेकर यांच्या ताब्यातील या अनधिकृत वाळू डंपरवर महसूलच्या पथकाने कारवाई केली. यावेळी मसुरे कोतवाल सचिन चव्हाण, मसुरे पोलीस श्री. फरांदे हे उपस्थित होते. काही दिवसापूर्वी मसुरे परिसरातील अनधिकृत वाळू रॅम्पही मंडळ अधिकारी श्री. चव्हाण यांनी महसूल यंत्रणा आणि पोलिसांच्या सहाय्याने तोडले होते. यापुढेही या भागातून अनधिकृत वाळू वाहतूकीवर करडी नजर ठेवण्यात येणार असल्याचेही श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.