भाजयुमो मालवण शहराध्यक्ष पदी ललित चव्हाण यांची नियुक्ती

माजी खासदार निलेश राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

कुणाल मांजरेकर

मालवण : भारतीय जनता युवा मोर्चाच्या मालवण शहराध्यक्षपदी रेवतळे येथील ललित हरी चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी श्री. चव्हाण यांस नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी निलेश राणे यांनी चव्हाण यांच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने तरूणांचे सैन्य तयार करण्यासाठी ललित चव्हाण यांनी कामास लागावे, त्यांना पक्षाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही निलेश राणेंनी दिली.

ललित चव्हाण हे भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सरचिटणीस हरी चव्हाण यांचे सुपूत्र आहेत. ते उत्कृष्ट कबड्डीपटू असून दांडगा मित्रपरिवार आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. या निवडीवेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, आबा हडकर यांच्यासह शहरातील अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुदेश आचरेकर यांनी ललित चव्हाण यांच्या निवडी बाबत समाधान व्यक्त करत चव्हाण कुटुंबीय गेली अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असून ललित चव्हाण यांच्या निवडीमुळे पक्ष संघटनेला निश्‍चितपणे बळ मिळेल, भारतीय जनता पक्ष बेसिकच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे त्यांना संघटना बांधणीसाठी सहकार्य मिळेल, अशी ग्वाही दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!