जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या कार्यतत्परतेचं होतंय कौतुक !
रस्त्यावर सापडलेला महागडा मोबाईल मूळ मालकाच्या स्वाधीन
कुणाल मांजरेकर
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या कार्यतत्परतेचा शुक्रवारी प्रत्यय आला आहे. सुकळवाड येथे मुख्य रस्त्यावर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना सापडलेला ओपो कंपनीचा महागडा मोबाईल पोलीसांनी मोबाईल धारक व्यक्तीचा शोध घेऊन त्यास मोबाईल परत केला. ड्युटीवर असताना पोलिसांनी दाखविलेल्या या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे.
सुकळवाड येथे मुख्य रस्त्यावर ड्युटीवर असणाऱ्या पोलीस हेड कॉन्स्टेबल एम. बी. देऊलकर, पोलीस कॉन्स्टेबल एम. के. शिरडे, पोलीस नाईक एस. व्ही. सोनसुरकर, पोलीस नाईक नितीन शेटये या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना रस्त्यावर पडलेला ओप्पो कंपनीचा महागडा अँड्रॉइड मोबाईल सापडून आला. हा मोबाईल त्यांनी ताब्यात घेत त्यावरून मोबाईल धारकाचा शोध लावला. हा मोबाईल खोटले येथील प्रशांत सावंत यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मोबाईल धारक प्रशांत सावंत हे सुकळवाड येथे आल्यावर त्यांना हा मोबाईल वाहतूक पोलिसांनी परत केला.