मान्द्रेच्या म्हाळसादेवीचा २५ ते २७ डिसेंबरला वर्धापन दिन उत्सव

गोवा : मान्द्रे – गोवा येथील म्हाळसादेवीचा वर्धापन दिन उत्सव सोहळा २५ ते २७ डिसेंबरला साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

शनिवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता नवचंडी, दुपारी आरती, महाप्रसाद तर रात्रौ ७ ते १० नाट्यप्रयोग होणार आहे. रविवारी २६ डिसेंबर रोजी सकाळी नित्य धार्मिक विधी, दुपारी नवचंडी सांगता, नंतर आरती, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ६.३० वाजता सुवासिनीसाठी कुंकुमार्चन कार्यक्रम, सायंकाळी ७ ते १० कुलबांधव हर्षद बुवा मांजरेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी २७ डिसेंबर रोजी देवीचा वर्धापनदिन साजरा होणार आहे. यानिमित्ताने सकाळी ९ वाजता लघरुद्र आणि पंचायतन देवतांस अभिषेक, तसेच इतर धार्मिक विधी, दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद होईल. तर सायंकाळी ४.३० वाजता स्थानिक कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम, रात्रौ ९ वाजता श्री म्हाळसादेवीची पालखीतून पंचायतन देवस्थानात सुवासिनींच्या दिवजासह मिरवणूक, रात्रौ १२ वाजता आरती आणि त्यानंतर तिर्थप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!