स्टेशन मास्तर, वाहतूक पोलिसाची तत्परता : “लाखमोलाची” बॅग प्रवाशाला परत

वैभववाडी रोड रेल्वे स्थानकातील घटना ; अडीच लाखांचे दागिने असलेली बॅग प्रवाशाला सुपूर्द

वैभववाडी : मुंबई ते वैभववाडी रोड पर्यंत रेल्वे प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची रेल्वेस्थानक परिसरात विसरलेली “लाख मोलाची” बॅग स्टेशन मास्तर आणि वाहतूक पोलिसाच्या तत्परतेमुळे परत मिळाली आहे. या बॅगेत जवळपास अडीच लाखांचे दागिने होते. या प्रामाणिकपणा बद्दल स्टेशन मास्तर संजय शिंगाडे आणि वाहतूक पोलीस विलास राठोड यांचे कौतूक होत आहे.

रेल्वे प्रवाशी प्रवीण शंकर चौगुले (रा. मोंड, ता. देवगड) हे ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मांडवी ट्रेनने गावी आले. ते वैभववाडी स्टेशन वर उतरले. दरम्यान त्यांच्या सामानातील एक बॅग घाईगडबडीत रेल्वे स्टेशन परिसरात राहीली. चौगुले देवगडला पोहोचल्यानंतर त्यांना बॅग राहिल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ पोलीस राठोड यांच्याशी संपर्क साधला. राठोड यांनी स्टेशन मास्तर यांना फोन करत माहिती दिली. स्टेशन मास्तर यांनी परिसरात असलेली लाल कलरची बॅग ताब्यात घेतली. रात्री ८ वाजता प्रवीण व ग्रामस्थ रेल्वे स्टेशनकडे आले. यावेळी स्टेशन मास्तर यांनी ती बॅग चौगुले यांच्या ताब्यात दिली. या बॅगेत गळ्यातील सोन्याचा हार किंमत ५० हजार, मंगळसूत्र किंमत १ लाख, सोन्याची चैन किंमत ५० हजार, कानातील कुड्या किंमत २० हजार, दोन अंगठ्या किंमत २० हजार व रोख ५५०० रुपये होते. स्टेशन मास्तर यांच्या समोर सदर दागिन्यांची चौगुले यांनी खात्री केली. बॅगेतील संपूर्ण ऐवज आपल्याला मिळाला असल्याचे लेखी स्वरूपात चौगुले यांनी लिहून दिले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!