एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन तीव्र ; मंत्री अनिल परब समिती स्थापन करणार

मालवणसह जिल्ह्यातील एसटी ठप्प : शासनात विलनीकरण मागणीवर कर्मचारी ठाम

कुणाल मांजरेकर

मालवण : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी गेले काही दिवस सुरू असलेले एसटी कर्मचारी यांचे आंदोलन सोमवारी अधिक तीव्र बनले आहे. मालवण आगरासह जिल्ह्यातील सर्वच आगारातील कर्मचारी संपात उतरले असून यांमुळे जिल्ह्यातील एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटीचे राज्य शासनात विलगीकरणाच्या मागणीचा अभ्यास एक समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मालवण आगारातून सुटणाऱ्या गाड्या सोमवार पासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. चालक, वाहक यासह सर्व एसटी कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. मालवण आगारातून सुटणाऱ्या सर्व गाड्या मध्यरात्री पासून बंद आहेत. ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सरकार अभ्यास समिती नेमणार : अनिल परब

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने ठिकठिकाणी एसटीची चाके ठप्प आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाचे शासनात विलगीकरण करण्याबाबतचा अभ्यास करण्यासाठी सोमवारी राज्य सरकार समिती स्थापन करणार आहे. दुपारी ३ च्या आधी न्यायालयाच्या आदेशानुसार या समितीचा जीआर जारी करणार आहे. तसेच ही समिती विलिनीकरणाबाबत अभ्यास करून सरकारला अहवाल देणार असल्याची माहितीही परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!