आ. वैभव नाईक यांनी घेतले रामेश्वर- नारायणाच्या पालखीचे दर्शन
मालवण : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर- नारायण यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा आज भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न होत आहे. या पालखी सोहळ्याला कुडाळ- मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन पालखीचे दर्शन घेतले.
परंपरेने बलिप्रतिपदेच्या दिवशी हा पालखी सोहळा पार पडतो. असंख्य भाविक भक्तगण या सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतात. यावर्षीही मोठ्या संख्येने भाविक, भक्तगणांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. आमदार वैभव नाईक यांनी पालखी प्रदक्षिणेत सहभागी होऊन श्री देव रामेश्वर- नारायण यांचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेविका सेजल परब, तृप्ती मयेकर, पंकज सादये, प्रसाद आडवणकर, बाळू नाटेकर, सन्मेश परब, तपस्वी मयेकर, महेंद्र पराडकर, प्रवीण लुडबे, प्रवीण रेवंडकर, यशवंत गावकर आदी उपस्थित होते.