साळगाव घाटकरवाडीतील उबाठा सैनिकांचा शिवसेनेत प्रवेश ; दत्ता सामंत यांनी केले स्वागत
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माणगांव खोऱ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. कुडाळ तालुक्यातील साळगाव घाटकरवाडीतील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी गावच्या विकासासाठी शिवसेनेत प्रवेश केला. दत्ता सामंत यांनी त्यांचे स्वागत करून वाडीतील किमान ९० टक्के मतदान महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना करण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.
प्रवेशकर्त्यांमध्ये नागेश शिंदे, कृष्णा घाटकर, अशोक घाटकर, अमोल घाटकर, किरण घाटकर, साईश शिंदे, ओंकार घाटकर, बाळा घाटकर, लवू घाटकर, अनिकेत घाटकर, बाळकृष्ण घाटकर, कृष्णा सावंत, गुणाजी घाटकर, विजय गायचोर, सदाशिव गायचोर, जनार्दन कदम, अरुण गायचोर, प्रथमेश घाटकर, रंजना घाटकर, अनुजा घाटकर, सरिता घाटकर, उत्कर्षां घाटकर, सेजल घाटकर, सीमा घाटकर, प्रियांका घाटकर, रसिका घाटकर, संजय घाटकर, महादेव घाटकर, सुचिता शिंदे, कांचन घाटकर, जयश्री शिंदे, रामचंद्र घाटकर, संकेत घाटकर, अमित गायचोर, देवेंद्र गायचोर, शुभांगी गायचोर आदींचा समावेश आहे. यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, उपजिल्हा प्रमुख राजा गावडे, विश्वास गावकर, प्रीतम गावडे, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, रत्नाकर जोशी यांच्यासह महायुतीचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.