महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना चिंदर सडेवाडीतून मोठे मताधिक्य देणार

शिवसेनेचे सोशल मीडिया कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख मनोज हडकर यांचा विश्वास ; जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी घेतला आढावा

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराला चिंदर सडेवाडीतील ज्येष्ठ नागरिक आणि युवा पिढीकडून मोठा प्रतिसाद मिळत असून निलेशजी राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली चिंदर सडेवाडीतून निलेश राणे यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार असल्याचा विश्वास शिवसेनेचे सोशल मीडिया कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख मनोज हडकर यांनी व्यक्त केला आहे. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी याठिकाणी भेट देऊन प्रचाराचा आढावा घेतला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, संतोष कोदे, जेरॉन फर्नांडीस, मुजफ्फर मुजावर, जॉन नरोन्हा, पंढरीनाथ उर्फ भाऊ हडकर, दत्ता वराडकर, शैलेश गोलतकर, महेश हडकर, बाळू वराडकर, नितीन हडकर, शरद मुंबरकर, जयेश गोसावी, पराग मुळये, बळीराम मुळये, नंदकिशोर वराडकर, लक्ष्मण कांबळी, किरण सावंत आदी उपस्थित होते

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3859

Leave a Reply

error: Content is protected !!