Malvan | वायरी भूतनाथ गावात महायुतीचे उमेदवार निलेश राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ

श्री देव भूतनाथ चरणी श्रीफळ ठेवून आणि मोरयाचा धोंडा येथे १०१ नारळाचे तोरण अर्पण करून घरोघरी प्रचाराला सुरुवात

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ गावात मंगळवारी भाजपा शिवसेना महायुतीकडून प्रभाग ११० आणि १११ मध्ये प्रचाराचा  शुभारंभ करण्यात आला. श्री देव भूतनाथ चरणी श्रीफळ ठेवून आणि मोरयाचा धोंडा येथे १०१ नारळाचे तोरण अर्पण करून घरोघरी प्रचाराला सुरुवात आली. खा. नारायण राणे यांच्या निवडणुकीत केलेल्या नवसाची परतफेड करतानाच कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावेत, यासाठी पुन्हा एकदा मोरयाचा धोंडा येथे नवस करण्यात आला.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, बूथ अध्यक्ष केदार झाड, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, दाजी सावजी, देवानंद लोकेगांवकर, भाई मांजरेकर, पांड्या मायनाक, विकी लोकेगांवकर, दिलीप वाईरकर, मुन्ना झाड, विकास मसुरकर, मिलींद झाड, श्याम झाड, अरुण तोडणकर, श्री. बोडवे, कृष्णा देउलकर, रवींद्र खानविलकर, जगदीश टेंबुलकर, कान्हा माडये, प्रथमेश डीचवलकर, महेश लोकेगांवकर, सतिश नांदोसकर, बबन आडयेकर, बाबल गोसावी, आबा मांजरेकर, निकीता तोडणकर, सौ. मोंडकर, करण तोडणकर, सनद तोडणकर, मंदार घारे, मंदार आडकर, ऋषी तोडणकर, प्रशांत तोडणकर, कुणाल नाईक, राजा नाईक, चंदन नाईक, पप्या करंगुटकर, सुशील मेस्त, आनंद गांवकर, शैलेश लुडबे, बबन गावकर, शैलेश गावकर, श्री. माडये, दादू डिचवलकर, गणेश सातार्डेकर, दिलीप वाईरकर, सुदेश मयेकर, मुकेश आचरेकर, विजय नांदोसकर, हेमंत वस्त, सुदेश मयेकर, उदय झाड, सतीश नांदोसकर, आयुष परुळेकर, सोहम चव्हाण, सिद्धेश पावसकर, तन्मय तळवडेकर, यश रावले, अक्षय देऊलकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3859

Leave a Reply

error: Content is protected !!