ऐन दिवाळीत अनिल देशमुखना अटक ; ख्रिसमसमध्ये अनिल परबांचा नंबर ?

आ. नितेश राणेंचे खोचक ट्विट ; संजय राऊत, नवाब मलिकांचे मानले आभार

कुणाल मांजरेकर

मालवण : १०० कोटीच्या वसुली प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने ऐन दिवाळीत अटक केली आहे. या कारवाईनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी खोचक ट्विट करत दिवाळीत अनिल देशमुख तर ख्रिसमस मध्ये अनिल परब यांच्या अटकेची शक्यता वर्तवली आहे. “अनिल देशमुख हॅपी दिवाली, अनिल परब हॅपी ख्रिसमस… स्पेशल थँक्स टू संजय राऊत, नवाब मलिक” असं ट्विट नितेश राणेंनी केलं आहे.

१०० कोटींच्या वसुली आदेश प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काल रात्री १२ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. अनिल देशमुखांना अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यातच भाजप आमदार नितेश राणे यांनी खोचक टीका करणारं ट्विट केलं आहे. “अनिल देशमुख हॅपी दिवाली आणि अनिल परब मेरी ख्रिसमस?, स्पेशल थँक्स टू नवाब मलिक आणि संजय राऊत”, असं ट्विट नितेश राणे यांनी करत ख्रिसमसमध्ये अनिल परबांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!