जानवलीत उबाठा सेनेला धक्का ; पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश ; आ. नितेश राणे यांनी केले स्वागत
कणकवली : जानवली बौद्धवाडी येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख प्रमुख प्रवीण कदम, युवासेना शाखाप्रमुख निलेश पवार, उपशाखाप्रमुख स्वप्निल पवार, चैतन्य पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत येथील ओम गणेश निवासस्थानी भाजपात प्रवेश केला. यावेळी आ. नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उबाठा सेनेला या पक्ष प्रवेशामुळे मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी भाजपा पदाधिकारी मिलिंद मेस्त्री, रंजन राणे,संदीप सावंत राजू हिरलेकर, सरपंच अजित पवार, प्रशांत राणे, नयन दळवी, समीर प्रभूगावकर, स्वप्निल चिंदरकर व पदाधिकारी उपस्थित होते.