विराट शक्तीप्रदर्शनात कणकवलीत महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

नामांकन रॅलीत लोटला जनसागर ; हजारोंची गर्दी, ढोल ताशा, घोषणा आणि फटाक्यांची आतिषबाजी 

कणकवली : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणेंनी कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी जगदीश कातकर त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार नितेश राणे यांनी तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने कणकवली गांगो मंदिर ते प्रांत कार्यालय अशी भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीने आम.नितेश राणे जावून उमेदवारी अर्ज दाखल केला. श्रीदेव गांगो मंदिरात देवतेला श्रीफळ देऊन रॅलीची सुरुवात करण्यात आली. भाजप नेते नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, निलेश राणे, सौ नीलमताई राणे, सौ नंदिता राणे, सौ प्रियंका राणे, कु. अभिराज राणे, कु. निमिश राणे, माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार प्रमोद जठार, दत्ता सामंत यांच्यासह हजारो प्रमुख पदाधिकारी आणि जनसागराच्या उपस्थितीत ही रॅली रवाना झाली.

रॅलीमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, आरपीआय माहायुतीचे पदाधिकारी सहभागी झाले. त्यात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक , माजी आमदार अजित गोगटे, माजी आम. प्रमोद जठार,माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री व, माजी जि. प. उपाध्यक्ष आरीफ बगदादी,देवगड तालुकाध्यक्ष राजू शेटये, अमित साटम, दया पाटील, वैभववाडी तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, दिलीप रावराणे, प्राची तावडे, उषकला केळुसकर, प्रियंका साळसकर,  देवगड तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, जिल्हा चिटणीस अमोल तेली, भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव आदी सहभागी झाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!