वरची गुरामवाडी मधील भाजप कार्यकर्त्यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश
आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा
मालवण : मालवण तालुक्यातील वरची गुरामवाड मधील भाजप कार्यकर्त्यांनी मंगळवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश आहे. आमदार वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत, असे सांगत यापुढील काळातही ते गुरामवाडी मधील विकासकामांना प्राधान्य देतील, असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी वरची गुरामवाडी शाखाप्रमुखपदी गणेश कदम व उपशाखाप्रमुखपदी विजय गुराम यांची आमदार वैभव नाईक यांनी नियुक्ती पत्र देत नेमणूक केली आहे.
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले, या मतदारसंघाचा मी दहा वर्ष आमदार असून मी केलेली विकासकामे बघा आणि प्रतिस्पर्धी उमेदवार हे पाच वर्ष खासदार होते तर त्यांचे वडीलही पाच वर्षे मंत्री आणि पाच वर्ष खासदार आहेत. त्यांनी केलेली विकासकामे बघा. निश्चितच यामध्ये आमचा आलेख चढता आहे.५ वर्ष नारायण राणे हे उद्योगमंत्री असून गुरामवाडीमध्ये विकास कामे करू शकले नाहीत हे त्यांचे अपयश आहे. गुरामवाडी मधील विकासकामे यापुढे देखील निश्चित पणे मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी दिले.
यावेळी गुरामवाडी मधील सूर्यकांत कुडाळकर, भाऊ गोठणकर, तुकाराम घोडगेकर, रामचंद्र पालव, धाकू पालव, विश्राम गुराम, लक्ष्मण कदम, रंजीत कदम, शिवराम वारंग, ललित पालव, गणेश कदम, शिवराम गुराम, सागर गुराम, अशोक गुराम, रामचंद्र चव्हाण, भास्कर गुराम, द्वारकानाथ पालव, शशिकांत गुराम, राघो झोरे, संतोष झोरे, बिरु झोरे यांसह अनेक भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, ग्रामपंचायत सदस्य बाबू टेंबुलकर, विभागप्रमुख शिवा भोजने, खालची गुरामवाड रवि गुराम, युवासेना विभागप्रमुख वंदेश ढोलम आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.