भाजपा नेते निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून कुंभारमाठमध्ये विविध विकास कामांची भूमिपूजने
माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत यांची प्रमुख उपस्थिती ; ग्रामस्थांनी मानले आभार
मालवण : मालवण तालुक्यातील कुंभार माठ गावात भाजपाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांची भूमिपूजने भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यात जनसुविधा अंतर्गत मंजूर असलेल्या कुंभारमाठ चव्हाण भरडे वाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण आणि कुंभारमाठ शिवाजी पुतळा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण या कामाचा समावेश आहे.
कुंभारमाठ चव्हाण भरडे वाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचे जेष्ठ ग्रामस्थ रमेश फोंडेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. या कामासाठी ग्रामस्थांनी माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे मागणी केली होती. निलेश राणे यांच्या शिफारशी नंतर या कामासाठी जनसुविधा अंतर्गत आठ लाखाचा दिला मंजूर झाला होता. या भूमिपूजन प्रसंगी माजी सभापती मधुकर चव्हाण, सरपंच सौ.पुनम वाटेगावकर, उपसरपंच जीवन भोगावकर, सुंदर चव्हाण, संदिप फोंडेकर, सुनिल वस्त, सदानंद चव्हाण, अरुण फोंडेकर, जगदिश शिरोडकर, राहुल फोंडेकर, विशाल आपकर, बाळकृष्ण चव्हाण, सिद्धेश गावठे आदी उपस्थित होते.
तर कुंभारमाठ शिवाजी पुतळा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण या कामाचे माजी पंचायत समिती सभापती मधुकर चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कामासाठी ग्रामस्थांनी माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे मागणी केली होती. निलेश राणे यांच्या शिफारशी नुसार या कामासाठी जनसुविधा अंतर्गत आठ लाखाचा निधी मंजूर झाला होता. आज त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कुंभारमाठ सरपंच सौ.पुनम वाटेगावकर, घुमडे सरपंच सौ.स्नेहल बिरमोळे, कुंभारमाठ उपसरपंच जीवन भोगावकर, ग्रा.प सदस्य अनिता गावकर, प्रमोद भोगावकर, ग्रामस्थ श्री.रमेश फोंडेकर, सुंदर चव्हाण, संदिप फोंडेकर, सुनिल वस्त, सदानंद चव्हाण, अरुण फोंडेकर, जगदिश शिरोडकर, सुधीर वस्त, विनय गावकर, दिलीप सांगवेकर, श्रध्दा डिचवलकर, हर्षिता डिचवलकर, सिद्धेश गावठे आदी उपस्थित होते. या दोन्ही कामाना निधी उपलब्ध झाल्याबद्दल ग्रामस्थांनी भाजपा नेते निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.