संजय राऊतच्या स्वप्नातही हिंदूंचा गब्बर ; नितेश राणेंचा टोला 

काँग्रेसच्या कोठ्यावर नाचणाऱ्यांनी दुसऱ्यांना मदारी आणि माकड बोलू नये

कणकवली : काँग्रेसच्या कोठ्यावर नाचणाऱ्यांनी दुसऱ्यांना मदारी आणि माकड बोलण्याची हिंमत करू नये. स्वतःच्या बुडाखाली काय आग लागली आहे ते आधी पहावे. दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसच्या कोठ्यावर तुम्हाला मुजरे करायला लागतय आणि काँग्रेसवाले तरीही ढुंकून सुद्धा तुमच्याकडे बघत नाहीये. एका एका उमेदवारीसाठी तुम्हाला नाक रगडायला लागते, अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत उबाठा व संजय राऊत यांच्यावर केली.

काँग्रेसवाल्यानी अक्षरश: तुमच्या नाकातून रक्त काढलेला आहे. तुम्हाला किती उमेदवारीच्या सीट द्यायच्या, कशा सीट द्यायच्या ह्याच्यावर जे काय काँग्रेसवाले तुमच्यासमोर डोळे वटारून दाखवत आहेत आणि त्याच्या समोर जे तुमची काय चालत नाहीये ना, त्या संदर्भात पहिलं आपलं थोबाड उघड आणि मग अन्य लोकांवर टीकाटिपणी करण्याची हिंमत कर, असे नितेश राणे यांनी संजय राऊत यांना सुनावले. त्याग आणि उद्धव ठाकरे हे समीकरण कधीच नाही. त्यागाचे महत्व संजय राजाराम राऊतला समजणार नाही. हिंदुत्व या विषयावर तडजोड करण्यापलीकडे ह्यांनी काही केल नाही. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी जो काही त्याग केला आहे, तो ह्याच्यासारख्या तीनपाट माणसाला समजणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना अनेक कॉन्ट्रॅक्ट स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर ठेवणाऱ्या भ्रष्टाचारी संजय राऊतला त्याग काय असतो ते कळणार नाही. संजय राऊतच्या स्वप्नात पण हिंदूंचा गब्बर येतो, म्हणून त्याची आई बोलते झोप नाय तर हिंदूचा गब्बर येईल, असा टोला नितेश राणे यांनी लगावला. ह्याच्यासारख्या औरंग्याच्या नाजायज औलाद्यांकडून आम्हाला हिंदुत्वाचे प्रमाणपत्र नकोय. आमचं रक्त भगवं आहे. तुमच्या सारखं हिरवं नाही, अशा शब्दात त्यांनी सुनावले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3842

Leave a Reply

error: Content is protected !!