सातेरी मंदिर येथील रानडे घरानजीकच्या पाणंद काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

माजी नगरसेविका पूजा करलकर यांचा पाठपुरावा

मालवण : मालवण सातेरी मंदिर येथील रानडे घरानजीकच्या पाणंद काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ नगरसेविका पूजा करलकर यांच्या उपस्थितीत तर आश्विन मराळ व विजया मराळ यांच्या हस्ते करण्यात आले. 

माजी नगरसेविका पूजा करलकर यांनी सदर कामासाठी नगरपरिषदेकडे पाठपुरावा केला होता, त्यांच्या प्रयत्नातून सातेरी मंदिर येथील रानडे घरानजीकच्या पानंदीच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पूजा करलकर, विजया चव्हाण, मिलन मराळ, प्रमोद मराळ, दिव्या चव्हाण शुभांगी ठुंबरे, दिव्या वीर, जागृती मराळ, प्रणिता मराळ, अश्विनी मराळ, तनुजा मराळ, गायत्री मराळ, शिल्पा मराळ, बाळा चव्हाण प्रणाली चव्हाण सुगंध वीर, निकिता आचरेकर, शितल  मराळ, महेश हडकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!