बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात उद्या ३ ऑक्टोबरला मुंबईत महत्वाची बैठक
बांधकाम कामगार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष हरी चव्हाण यांची माहिती
मालवण : महाराष्ट्र बांधकाम विभागात झालेला एजंटांचा सुळसुळाट आणि बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात उद्या गुरुवार दि. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई येथे महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या प्रश्नांसंदर्भात बांधकाम कामगार महासंघाने पाठपुरावा केला होता. या बैठकीत विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होण्याची अपेक्षा बांधकाम कामगार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष हरी चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.