पर्यटन हा केवळ चर्चेचा नाही तर गांभीर्याने घेण्याचा विषय !

जागतिक पर्यटन दिनानिमित्त रत्नागिरीत आयोजित पर्यटन परिषदेत भाजपा नेते निलेश राणे यांचे प्रतिपादन

रत्नागिरी : पर्यटन हा फक्त चर्चा करण्यापुरता विषय नाही तर तो गांभीर्याने घेण्याचा विषय असून कोकणवासीयांनी यासाठी एकजुटीने आपल्या हक्कासाठी झगडले पाहिजे असे प्रतिपादन भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केले. 

रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने पर्यटन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, ग्लोबल कोकणचे संचालक संजय यादवराव, संतोष कामतेकर, पर्यटन संस्थेचे संचालक राजू भाटलेकर, इंफिगो आय केअर सेंटरचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक श्री. नाचणकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. राणे म्हणाले केवळ रस्ते, केवळ हॉटेल्स म्हणजे पर्यटन नाही तर पर्यटन ही एक पॉलिसी आहे, तो फावल्या वेळेचा विषय नाही तर पूर्णवेळ व्यवसाय आहे. एक वर्तुळ आहे. यासाठी प्रत्येक व्यावसायिकाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे तशीच ती सरकारने घेतली पाहिजे. गोव्याचं पर्यटनासाठी स्वतंत्र बजेट असते, मग आपल्याकडे सुद्धा तितक्याच गांभीर्याने याकडे पाहिले पाहिजे यासाठी इथल्या लोकप्रतिनिधीनी कोकणची ही गरज सरकारकडे मांडली पाहिजे आणि त्यासाठी इथल्या व्यावसायिकाने आक्रमक होत आपला हक्क भांडून मागितला पाहिजे नव्हे मिळवलाच पाहिजे असेही ते म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!