राजकोट पुतळा दुर्घटना : आ. वैभव नाईक यांच्या बरोबरच सहकाऱ्यांची सखोल चौकशी करा…

भाजपा नेते निलेश राणे यांची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेत आमदार वैभव नाईक हेच मुख्य सूत्रधार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आ. नाईक यांचे १६ ऑगस्ट ते आतापर्यंतचे सीडीआर, मोबाईल टॉवर लोकेशन यांची तपासणी व्हावी. त्या सोबतच त्यांचे वाहन चालक, स्वीय सहाय्यक, जवळचे सहकारी व त्यांच्या सोबत असलेले इतर कर्मचारी या सर्वांचे देखील सी डी आर तपासून राजकोट दुर्घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांनी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे.

२६ ऑगस्ट २०२४ रोजी मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळण्याची दुर्घटना झाली. राजकोट येथील दुर्घटना ही खरच दुर्घटना आहे की कुठल्या कटाचा भाग आहे हे या तपासापर्यंत समजू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही आमच्यासाठी अत्यंत गंभीर घटना असून सदरील प्रकरणात या तक्रारीची गंभीर दखल घेऊन सखोल तपास करून कारवाई करावी, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!