भाजपाचा उद्या कुडाळला कार्यकर्ता मेळावा
केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
कुणाल मांजरेकर
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी २९ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता महालक्ष्मी हॉल, गुलमोहर हॉटेल, कुडाळ येथे होणार आहे. या मेळाव्यात केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर, रत्नागिरी- सिंधुदुर्ग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अजितराव गोगटे, दत्ता सामंत आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्याला सर्व जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, सर्व मोर्चा/आघाडी जिल्हा तसेच मंडल अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, पं. स. सदस्य नगराध्यक्ष, नगरसेवक, भाजपा लोकप्रतिनिधी तसेच प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे.