… तर हिंदूंना संघटित व्हावेच लागेल : अनिरुद्ध भावे 

मालवणात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हिंदू एकता मेळावा संपन्न

मालवण : आज हिंदू धर्म एका मोठ्या संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. आपले अस्तित्व जपण्यासाठी हिंदू धर्म अनेक आव्हानांना सामोरा जात आहे. अनेक ठिकाणी हिंदू धर्मीय धार्मिक संकटाना तोड देत आहेत. अत्याचाराला बळी पडत आहेत. ही परिस्थिती बदलायची असेल तर येणाऱ्या काळात हिंदूंना संघटित व्हावेच लागेल, त्यांना आपली शक्ती दाखवावी लागेल असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत सहमंत्री अनिरुद्ध भावे यांनी केले. जानकी मंगल कार्यालय, कुंभारमाठ येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित हिंदू एकता मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष दिघे, प्रमुख पाहुणे रमेश चव्हाण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघप्रचारक ऍड. समीर गवाणकर, बजरंग दल प्रखंड प्रमुख श्रीराज बादेकर, सिंधुदुर्ग जिल्हा सत्संग संचालक उदय गावडे, प्रखंड प्रमुख भाऊ सामंत, विलास हडकर, विश्व हिंदू परिषदेचे संदीप बोडवे, हरेश फडते, डॉ. अजित लिमये, महेश कांदळगावकर, बाबा मोंडकर, भगवान लुडबे, संतोष लुडबे, अविनाश सामंत, डॉ. राहुल पंतवालावलकर, विकी तोरसकर, बाळासाहेब पंतवालावलकर, सनातनचे दीनानाथ गावडे, छोटू सावजी, धनाजी भगत, दादा वेंगुर्लेकर, बबन परुळेकर, विनोद सांडव, राजन गांवकर, उमेश सावंत, तारका चव्हाण, झुंझार हरमलकर, प्रदीप मुंबरकर, सुधाकर दुदवडकर, केदार झाड, गौरी    सामंत यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी अनिरुद्ध भावे पुढे म्हणाले, जगातील सगळ्या हिंदूंचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आजपासून बरोबर साठ वर्षांपूर्वी संत महंतांच्या उपस्थितीत, त्यांच्या आशीर्वादाने विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. त्या नंतर देशात जेव्हा जेव्हा हिंदुत्त्वाला मारक परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा तेव्हा विश्व हिंदू परिषदेने आपले दायित्व निभावले आहे. जात, पात विसरून समस्त हिंदू समाज संघटित व्हावा यासाठी विश्व हिंदू परिषद काम करत आहे. अनेक परधर्मियांच्या धोक्यांची हिंदू धर्मियांना जाणीव करून देण्यासाठी हे संमेलन असल्याचेही भावे म्हणाले.

प्रास्ताविकात ऍड. समीर गव्हाणकर म्हणाले, देशात आणि देशाच्या बाहेर अनेक ठिकाणी हिंदू धर्मीय झपाट्याने अल्पसंख्यांक होत चालले आहेत, इतिहासाकडे नजर टाकल्यावर हे आपल्या लक्षात येईलच. या देशात स्वतःचे सैन्य, सरकार आणि न्यायपालिका असताना सुद्धा काश्मीरमध्ये हिंदूंना न्याय मिळू शकला नाही. अनेक ठिकाणी धार्मिक दंग्यांमध्ये केवळ ते हिंदू होते म्हणून अनेक जण मारले गेले आहेत. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी विर सावरकरांनी हिंदू धर्मियांना दिशा दाखविली आहे, विचार दिला आहे. या विचारांवर आज समस्त हिंदू समाजाने मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदे सारख्या अनेक संघटना जगात हिंदूंचा आवाज बळकट करत आहेत. हिंदूंना एकत्र आणण्यासाठी असंघटना झटत आहेत जर का आपण एकत्र आलो नाहीतर आज जी बांगलादेशमध्ये पश्चिम बंगाल मध्ये केरळमध्ये परिस्थिती दिसत आहे तीच परिस्थिती आपल्या येथेही घेण्यास वेळ लागणार नाही. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष दिघे, प्रमुख पाहुणे रमेश चव्हाण गुरुजी यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभुदास आजगावकर यांनी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!