महान भाजपाच्या वतीने आयोजित नारळ लढवण्याच्या स्पर्धेत राणे, नेरकर, साळुंखे प्रथम

मालवण : भारतीय जनता पार्टी महान यांच्या वतीने आयोजित केलेल्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत अजित राणे, रसिका नेरकर आणी शिवराज साळुंखे यांनी गटानुक्रमे प्रथम क्रमांक प्राप्त केला. 

या स्पर्धेसाठी जिल्हा बँक संचालक बाबा परब तसेच प्रसिद्ध नारळ लढवणारे स्पर्धक आसिफ भाई यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी भाजपचे तालुका उपाध्यक्ष सुधीर साळसकर, अरविंद सावंत, सुहास साळुंखे, मदन घाडी, सरपंच अक्षय तावडे, उपसरपंच अजित राणे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस संग्राम साळसकर, मंगेश साळसकर, विपुल परब , रवींद्र साळसकर, अशोक जाधव, हेमंत शिंदे, संदीप शिंदे, नीलकंठ घाडी, संतोष साळसकर, दिनेश घाडी , रेजन घाडी, चेतन साळसकर, सूरज गावडे, मंदार शिंदे, ओमकार शिंदे, शुभम हळवे, शुभम शिंदे, प्रणव शिंदे, निता चव्हाण, अश्विनी जाधव आणि सर्व खेळाडू उपस्थित होते.

स्पर्धेत पुरुष गटात अजित राणे, दिनेश घाडी यांनी प्रथम दोन क्रमांक मिळवले. त्यांना अनुक्रमे रोख 2024 आणि चषक, रोख 1024 आणि चषक देण्यात आला. तर महिला गटात रसिका नेरकर आणि निता चव्हाण यांनी अनुक्रमे प्रथम दोन क्रमांक मिळवले. त्यांना अनुक्रमे आकर्षक साडी आणि चषक, रोख 501 आणि चषक देण्यात आला. लहान गटात शिवराज साळुंखे आणि आरुष चव्हाण यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना अनुक्रमे आकर्षक कलर सेट आणि चषक व आकर्षक चषक देण्यात आला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!