नारळी पौर्णिमेनिमित्त मालवणात १९ ऑगस्टला पारंपारिक वेशभूषा स्पर्धा

मालवण व्यापारी संघाचे आयोजन ; दोन गटात होणार स्पर्धा

मालवण | कुणाल मांजरेकर

नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून सोमवार दि. १९ ऑगस्ट रोजी मालवण व्यापारी संघाच्या वतीने यावर्षी पारंपारिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मारुती मंदिर सोमवार पेठ मालवण येथुन दुपारी ३ वाजता सुरु होऊन बंदरजेटी येथे संपणार आहे. तर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी ५ वाजता मारुती मंदिर सोमवार पेठ मालवण येथे होईल. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.

या स्पर्धेत बालवाडी ते इयत्ता तिसरी गटात प्रथम तीन क्रमांकांना रोख रुपये १०००/- व प्रशस्त्रीपत्र, रोख रुपये ७००/- व प्रशस्तीपत्र, रोख रुपये ५००/- व प्रशस्तीपत्र दिले जाणार असून उत्तेजनार्थ दोन क्रमाकांना प्रत्येकी ३००/- व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

इयत्ता चौथी ते सातवी च्या दुसऱ्या गटात प्रथम तीन क्रमाकांना रोख रुपये १५००/- व प्रशस्तीपत्र, रोख रुपये १२००/- व प्रशस्तीपत्र, रोख रुपये ८००/- व प्रशस्तीपत्र दिले जाणार असून उत्तेजनार्थ दोन क्रमाकांना प्रत्येकी रोख रुपये ५००/- व प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी स्पर्धकांनी नाव नोंदणीसाठी अरविंद सराफ मो. ९४२२४३४८३१ या क्रमांकावर १९ ऑगस्ट २०२४ पर्यंत दुपारी २.०० वाजेपर्यंत द्यावी, असे आवाहन मालवण व्यापारी संघाने केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!