पश्चिम बंगाल मध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या डॉक्टरांचा देशव्यापी बंद

मालवणमध्येही वैद्यकीय सेवा बंद राहणार ; मालवण मेडिकल असोसिएशनची माहिती
मालवण : पश्चिम बंगाल मधील स्त्री डॉक्टरवर झालेल्या सामूहिक अत्याचार, बलात्कार आणि अमानुष खून प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला प्रतिसाद म्हणून मालवण मेडिकल असोसिएशन एकदिवसाच्या लाक्षणिक संपात सहभागी होत आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर १७ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजल्यापासून पुढील २४ तासांसाठी बाह्यरुग्ण सेवा बंद राहतील. तसेच अति तातडीच्या सोडून सर्व वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत. याची रुग्णांनी नोंद घ्यावी असे आवाहन मालवण मेडिकल असोसिएशनच्यावतीने करण्यात आले आहे.


