स्थानिक आमदार निष्क्रिय आहे, हे आज पुन्हा एकदा सिद्ध !
कुडाळ मालवणच्या जनता दरबारातील तक्रारींच्या संख्येवरून भाजपा नेते निलेश राणे यांचा टोला
मालवण | कुणाल मांजरेकर
कुडाळ मालवण मतदार संघाचा पालकमंत्र्यांचा जनता दरबार आज जिल्हा मुख्यालयात पार पडला. यामध्ये तब्बल ७५० तक्रार अर्ज दाखल झाले. या संख्येवरून भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली आहे.
याबाबत निलेश राणे यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून पोस्ट केली आहे. या पोस्ट मध्ये ते म्हणतात, ” कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचा आजच्या जनता दरबारात तक्रारींचा पाऊस पडला, तब्बल ७५० अर्ज आज जमा झाले. आम्ही जे सातत्याने म्हणत होतो स्थानिक आमदार निष्क्रिय आहे, जनतेची कामं सोडवण्यामध्ये अपयशी ठरले आहेत ते आज परत एकदा सिद्ध झालं. अनेक विषय आज मार्गी लागले, लहानसहान कामं जागेच मार्गी लागली म्हणून कुडाळ मालवणच्या जनतेने पण समाधान व्यक्त केले.”