भुयारी गटाराच्या मलिद्याचे जनक असलेल्या मंदार केणी यांनी नैतिकतेच्या गप्पा माराव्यात, यासारखा जोक नाही… 

भाजपाच्या मनोज हडकर यांची टीका ; धोंडी चिंदरकर हे संघटन कौशल्य असलेले कुशल राजकारणी

नगरसेवक पद गेल्यावर ज्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला त्यांनी कुवतीच्या गोष्टी सांगू नये

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्यावर टीका करणाऱ्या ठाकरे गटाचे प्रवक्ते मंदार केणी यांच्यावर भाजपचे सोशल मीडिया प्रमुख मनोज हडकर यांनी हल्लाबोल केला आहे. भुयारी गटाराच्या मलिद्याचे जनक असलेल्या मंदार केणी यांनी नैतिकतेच्या गप्पा माराव्यात, यासारखा जोक नाही, असे सांगून धोंडी चिंदरकर हे संघटन कौशल्य असलेले कुशल राजकारणी आहेत. तुम्ही स्वतःची कुवत तपासून पहावी, असे श्री. हडकर यांनी म्हटले आहे.

भाजपाचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्यावर टीका करणाऱ्या मंदार केणी यांच्यावर मनोज हडकर यांनी टीका करताना म्हटले आहे की, नगरसेवक पद गेल्यावर ज्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला त्यांनी कुवतीच्या गोष्टी सांगू नये. ज्यांच्या मुळे प्रत्येक गोष्टीत सगळ्या पक्षांना अपयश आलं, त्यांनी कुवतीच्या गोष्टी करु नयेत. विकासाचा टेंबा कसला मिरवता ? सत्तेत असताना सगळ्याच गोष्टीत अपयश आलेल्यांनी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारावर कसले बोलता? बारसा, म्हाळ, गोंधळ पलीकडे कसलेही व्हिजन नसलेल्यानी विकासाच्या गप्पा माराव्या आणि उटसुट राणे कुटुंबावर बोलणे म्हणजे विकास काय? भुयारी गटाच्या मलिद्याचे जनक असलेले मंदार केनी नैतिकतेच्या गप्पा माराव्यात या सारखा दुसरा जोक नाही. नगरसेवक म्हणुन घरी बसल्यावर रोजगाराचा प्रश्न उद्भवणार, त्यावर मंदार केणी यांनी लक्ष द्यावे. धोंडी चिंदरकर हे एक कुशल राजकारणी आणि संघटन कौशल्य असलेले यशस्वी राजकारणी आहेत. तेव्हा तुम्ही स्वतः ची कुवत एकदा तपासून पहावी, असे सांगून गुपचूप पालकमंत्र्यांना भेटुन तुम्ही पायावर डोके कधी कधी ठेवता हे आमदार वैभव नाईक यांना माहीत नसल तरी आम्हाला माहीत आहे. परत कधी भेटणार ते पण सांगून टाका, असे मनोज हडकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3837

Leave a Reply

error: Content is protected !!