राजापूर मधल्या बॉक्साईट प्रकल्पाला स्वयंघोषित नेत्यांचा विरोध ; निलेश राणे कडाडले
“त्या” फालतू नेत्याच्या ढुंगणावर लाथ मारायची की पुन्हा एकदा ह्यांचा डाव साध्य होऊ द्यायचा, आता राजापुरच्या जनतेने ठरवायचे
रत्नागिरी : राजापूर मधल्या बॉक्साईट प्रकल्पाला जनसुनावणी होण्याआधीच राजापुरातील स्वयंघोषीत नेत्यांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. त्यांच्यावर भाजपाचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी टीका करतानाच आता राजापुरच्या जनतेनेच ठरवायचे या फालतू नेत्यांचा ढुंगणावर लाथ मारायची की परत ह्यांचा डाव सध्या करायचा, असे ट्वीट केले आहे.
राजापूर तालुक्यात बॉक्साइट प्रकल्प सुरु होणार असून त्यासंदर्भात २९ ऑगस्ट आणि ५ सप्टेंबर रोजी जनसुनावणी होणार होती. मात्र नेमका हा प्रकल्प काय आहे हे जाणून घेण्यापूर्वीच त्याला विरोध करण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी ही सुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित झाली. मात्र विरोध करणाऱ्या तथाकथित नेत्यांवर माजी खासदार निलेश राणे यांनी कडक शब्दात टीका केली आहे. या संदर्भात ट्वीट करताना निलेश राणे म्हणाले, रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यामध्ये अजून एक प्रकल्पाला विरोध. बॉक्साइट मायनिंग हे गेले अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहे, आयन ओर मायनिंग ही सिंधुदुर्गात आणि गोवा राज्यात गेले ७० वर्ष सुरू आहे. राजापूरचे काही स्वयंघोषित नेते आहेत ज्यांनी कोणाला कधी १० नोकऱ्या उपलब्ध केल्या नाहीत. पण कधी कुठला प्रकल्प आला की विरोध करायला हे नौटंकीबाज सर्वात पुढे असतात. आता राजापूरच्या जनतेने ठरवायचं आहे, या फालतू नेत्यांच्या ढुंगणावर लाथ मारायची की परत एकदा ह्यांचा डाव साध्य होऊ द्यायचा.’’ अशा कडक शब्दांत निलेश राणे यांनी विरोधकांवर टीका करतानाच राजापूरच्या जनतेला आवाहन केले आहे.