स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मालवणात होणार “सन्मान देशभक्तांचा” कार्यक्रम

सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि मालवण नगरपालिका यांचा संयुक्त उपक्रम 

मालवण | कुणाल मांजरेकर

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय (एनसीसी विभाग) आणि मालवण नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वा. “सन्मान देशभक्ताचा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत डॉ. पंकज सुभाष दिघे यांचे “१९४७ च्या इतिहासापासून आपण काय शिकलो” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 

तसेच भारतीय सैन्य दलातील ५८ महाराष्ट्र बटालियनचे आर्मी ऑफिसर यांचा सन्मान सोहळा व मुलाखत आयोजित केलेली आहे. हा सन्मान सोहळा झाल्यानंतर ठीक ६.३० वाजता मशाल फेरी आणि तिरंगा रॅली आयोजित करण्यात आलेली आहे. मशाल फेरी व तिरंगा रॅलीचा मार्ग सिंधुदुर्ग महावि‌द्यालय मामा वरेरकर नाट्यगृह भरड नाका बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळ टोपीवाला हायस्कूल कन्याशाळा सिंधुदुर्ग महावि‌द्यालय असा असणार आहे. तरी या राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमास मालवण पंचक्रोशीतील सर्व नागरिक, विविध संस्था, शाळा, कॉलेज, वि‌द्यार्थी, शिक्षक, सर्व शासकीय-निमशासकीय कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने हातामध्ये तिरंगा घेऊन सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मालवण नगरपालिका, इंडियन स्वच्छता लीग कॅप्टन आणि राष्ट्रीय छात्र सैना विभागप्रमुख, लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत, नगरपालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे, सिंधुदुर्ग कॉलेज प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सीडीसी अध्यक्ष अॅड. समीर गवाणकर, सेक्रेटरी गणेश कुशे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, एनसीसी विभागातील आणि NCC cadets यांनी केलेले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!