चिपी विमानतळावरून सिंधुदुर्ग – पुणे विमानसेवा सुरु होणार !

फ्लाय ९१ विमान कंपनीकडून मिळणार सेवा ; माजी सभापती निलेश सामंत यांनी मानले खा. नारायण राणेंचे आभार

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर 

चिपी विमानतळावरून सिंधुदुर्ग ते पुणे विमानसेवेला विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालय यांनी परवानगी दिली असून गणेश चतुर्थी पूर्वी ही विमानसेवा Fly 91 कंपनीतर्फे सुरु करण्यात येणार आहे. सध्या प्रत्येक शनिवार, रविवारी चिपी-पुणे -चिपी अशी प्रवासी विमानसेवा सुरु करण्यात येत आहे. 

याबाबत पुणे विमानतळ येथे स्लॉट उपलब्ध करून मिळणेसाठी अडचण येत होती. याबाबत खासदार नारायण राणे यांनी हवाई मंत्री आणि संरक्षण मंत्री यांना पत्र पाठवून लक्ष वेधले होते. यानंतर दोन दिवसासाठी विमान सेवा सुरु करण्याचे आदेश  देण्यात आले. या बाबतची माहिती माजी सभापती निलेश सामंत यांनी दिली आहे. त्यांनी खा. नारायण राणे यांची भेट घेऊन याबद्दल आभार मानले. ही विमानसेवा संपूर्ण आठवडाभर सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. या बाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन खा. राणे यांनी दिले. यावेळी आमदार नितेश राणे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!