मालवणचे आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांचे आकस्मिक निधन

मालवण : मालवण एसटी आगाराचे आगारप्रमुख सचेतन जयराम बोवलेकर (५७, रा. धुरीवाडा मालवण) यांचे अल्पशा आजाराने पणजी येथील रुग्णालयात सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने एसटी कर्मचारी वर्गाकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच एसटी कर्मचाऱ्यांनी पणजी गोवा येथे जात अंत्यदर्शन घेतले. मालवण एसटी आगारातून जास्तीत जास्त लांब पल्ल्याच्या गाड्या चालविण्यासाठी आणि एसटी कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी बोवलेकर यांचा सतत प्रयत्न असे. आगारप्रमुख असूनही सर्वच कर्मचाऱ्यांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. बोवलेकर हे सच्चू या नावानाचे सुपरिचित होते. एसटी निवृत्त अधिकारी राजाराम बोवलेकर यांचे ते मुलगे तर एलआयसी विभागातील अधिकारी सतेजा बोवलेकर यांचे पती होत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!