सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज येथे उद्या ठाकरे शिवसेनेचे आंदोलन

शिंदे- फडणवीस सरकार, अधिष्ठता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नाकर्तेपणामुळे मेडिकल कॉलेजला १२ लाखाचा दंड

सिंधुदुर्ग : शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने बारा लाखाचा दंड केला आहे. शिंदे -फडणवीस सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता व  जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नाकर्तेपणामुळे हा दंड करण्यात आला आहे.  त्यामुळे शिंदे- फडणवीस  सरकार, अधिष्ठता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विरोधात  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून  उद्या मंगळवार दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!