भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून यंदाही गणेशोत्सवासाठी “मोफत रेल्वे प्रवास”
५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. दादर रेल्वे स्थानकातून कोकणात सुटणार “भाजपा एक्सप्रेस”
मालवण | कुणाल मांजरेकर
गणेश चतुर्थी निमित्त भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या वतीने दरवर्षी मुंबईतील चाकरमान्यांसाठी मोफत रेल्वे सोडण्यात येते. या वर्षी देखील निलेश राणे यांच्या कडून भाविकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यंदा ५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता दादर रेल्वे स्थानकातून ” भाजपा एक्सप्रेस” ही मोफत रेल्वे सोडली जाणार आहे. याबाबतची घोषणा निलेश राणे यांनी आपल्या “एक्स” अकाउंट वरून केली आहे.
या रेल्वे प्रवासासाठी बुकिंग करण्याकरिता 8657676404 किंवा 8657676405 या क्रमांकाशी संपर्क साधावा. बुकिंगची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत राहणार असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे.