माजी विद्यार्थ्यांची शाळेप्रती कृतज्ञता ; स्व खर्चाने केले वर्गखोलीचे नूतनीकरण
पोईपच्या इ. द. वर्दम शाळेच्या १९९० च्या दहावी बॅचचा आदर्श ; चार विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
पोईप (प्रसाद परब) मालवण तालुक्यातील पोईप येथील सौ. इ. द. वर्दम हायस्कुलच्या सन १९९० च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती अनोखी कृतज्ञता व्यक्त केली आहे. हायस्कुलच्या नववी (ब) वर्ग खोलीचे नुतनीकरण माजी विद्यार्थ्यांकडून उपलब्ध झालेल्या निधीतून करण्यात आले. १९९० च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी यासाठी आर्थिक योगदान केले. या वर्गखोलीचे उद्घाटन प्रशालेचे माजी मुख्याध्यापक इसेद फर्नांडिस सर यांच्याहस्ते करण्यात आले .
यावेळी गरजू चार शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाला लागणारी रोख रक्कम १९९० च्या माजी विद्यार्थ्यांनी प्रदान केली. तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेत पाचवी ते सातवी गट, आठवी ते दहावी गट, आणि अकरावी ते बारावी गट अशा गटात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले होते. त्यांना माजी विद्यार्थ्यांनी रोख रक्कम व ट्रॉफी अशी बक्षिसे दिली. तसेच प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य बाळगंगाधर टिळकांवर भाषणे केली.
शाळा वर्गखोली उदघाटनप्रसंगी सौ. इ.द.वर्दम हायस्कूलचे उपाध्यक्ष गोपीनाथ पालव, उपसचिव महेश पालव, खजिनदार महेंद्र पालव, सदस्य विश्वनाथ पालव, सत्यवान पालव, विलास माधव, सेवानिवृत माजी मुख्याध्यापक फर्नांडिस सर, सिमा पोईपकर, चव्हाण सर, मुख्याध्यापक श्री. कुंभार सर, शिक्षकवर्ग, १९९० दहावी बॅचचे माजी विद्यार्थी विनय चव्हाण, जगदिश आंबेडकर, महेश पालव, अनिल पालव, प्रशांत राणे, राजेंद्र धुरी, महेश मुरारी पालव, उमेश तावडे, धोंडी परब, सुगंधी पांजरी, महानंदा धुरी, स्मिता पालव, हेमलता तावडे, विनय गावकर व इतर उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष गोपीनाथ पालव यांनी माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी दिलेल्या या योगदानाबद्दल कौतुक केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केतकी सावंत यांनी केले तर आभार महाजनी सरानी मानले.