वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत मालवण तालुक्यात २.०८ कोटींचा निधी
२९ कामे मंजूर ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणेंचा पाठपुरावा : भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती
मालवण | कुणाल मांजरेकर
वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना सन 2024-25 अंतर्गत मालवण तालुक्यातील 29 कामांसाठी 2 कोटी 8 लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी पाठपुरावा केल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे.
यामध्ये असरोंडी मुख्य रस्ता काजरमळा ते ताटरबाव धनगरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (15 लाख),/असरोंडी ताठरबाव धनगरवाडी येथे स्मशानभूमीचे बांधकाम करणे ( 3 लाख), असरोंडी तळी धनगरवाडी येथे स्ट्रिटलाईट बसविणे (5 लाख), असरोंडी तळी धनगरवाडी येथे स्मशानभूमीचे बांधकाम करणे ( 3 लाख), ओवळीये सिध्दगडवाडी मुख्य रस्ता ते धनगरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे (10 लाख), ओवळीये सडा धनगरवाडी संत रामराव महाराज सभागृह बांधणे (25 लाख), ओवळीये खांदपरबवाडी वनिता वसंत गोसावी घरापासून ते स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ( 5 लाख), काळसे धनगरवाडीकडे जाणारा रस्ता तयार करणे (10 लाख), कुंभारमाठ धनगरवाडी शासकीय तंत्रनिकेतन रस्ता ते धनगरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (6 लाख), गोळवण धनगरवाडी खांबड भाग-1 येथे समाजमंदिर बांधणे ( 10 लाख), कुमामे धनगरवाडी येथे सार्व. शौचालय बांधणे (5 लाख), डिकवल धनगरवाडी रस्ता तयार करणे ( 10 लाख), तळगाव शेळवणेवाडी व काटापूरवाडी स्मशानभूमी ते वासुदेव गोरक्ष संस्था तर्फे आनंद आश्रम गोशाळा ते पुढे अणाव हद्दीपर्यंत जाणारा रस्ता तयार करणे ( 10 लाख), चिंदर पडेकाप येथे स्ट्रिटलाईट बसविणे ( 1.50 लाख), चिंदर पडेकाप येथे बोअरवेल बांधणे व पाईपलाईन करणे (3 लाख), चिंदर पडेकाप मुख्य रस्ता ते विश्वास खरात घरापर्यंत 100 मी. रस्ता डांबरीकरण करणे (2.50 लाख), नांदोस मुख्य रस्ता ते नांदोस सारंगवाडी धनगरवाडीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ( 6 लाख), नांदोस मुख्य रस्ता ते नांदोस कोक्याचे गाळू धनगरवाडीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ( 6 लाख), पोईप धनगरवाडी सोलर स्ट्रिट लाईट करणे ( 5 लाख), बुधवळे कलमकरी धनगरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ( 5 लाख), वेरळ सडेवाडी ते धनगरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ( 15 लाख), वेरळ धनगरवाडी येथे स्ट्रिटलाईट बसविणे ( 5 लाख), हिवाळे धनगरवाडी सौर स्ट्रिटलाईट बसविणे (5 लाख), हिवाळे धनगरवाडी येथे सार्व. विहीर दुरूस्ती करणे व खोलीकरण करणे (5 लाख), पोईप धनगरवाडी येथे नळपाणी योजना तयार करणे ( 5 लाख), ओवळीये सिध्दगडवाडी येथे सौर पथदिप बसविणे (7.50 लाख), ओवळीये सडा धनगरवाडी येथे सौर पथदिप बसविणे ( 7.50 लाख), ओवळीये खांदपरबवाडी येथे सौर पदिप बसविणे ( 7.50 लाख), कुमामे धनगरवाडी येथे स्ट्रिट लाईट बसविणे (5 लाख) या कामांचा समावेश आहे.