मालवण तहसील कार्यालयात आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यक्रम

सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार उमेदवार नोंदणी शिबीर  ; शासकीय – निमशासकीय पदांच्या भरतीसाठी होणार निवड प्रक्रिया

मालवण : महाराष्ट्र  शासन महसूल विभागामार्फत १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीमध्ये महसूल पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने आज शुक्रवार दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मालवण तहसील कार्यालयात जिल्हा  स्तरावरील मुख्यमंत्री युवा कार्य  प्रशिक्षण योजना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उमेदवार नोंदणी कॅम्प होणार आहे.

सिधुदुर्ग जिल्हयातील शासकीय निम शासकीय कार्यालये, महामंडळ अशा प्रत्येक कार्यालयात किमान १ उमेदवार व कमाल मंजूर पदांच्या ५ % उमेदवार या योजनेंतर्गत भरले जाणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय, कौशल्य विकास कार्यालय, सर्व नगरपालिका/नगरपंचायत, विद्युत वितरण MSEB, जिल्हापरिषद अंतर्गत सर्व कार्यालये व पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालय, कृषी विभाग, बांधकाम विभाग, महिला व बाल विकास विभाग, भुमी अभिलेख, आरोग्य विभाग, शासकीय मेडीकल कॉलेज, जिल्हा उद्योग केंद्र यासारखे  जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे यांचेकडील रिक्तपदे भरण्यांत येणार आहेत. आज रोजी ५६० रिक्तपदे पोर्टलवर अधिसूचित केली आहेत. यात Clerk, Data Entry Operator, Electrician, Wireman, Driver, Engineer, Agriculture Related, Nurse, Peon, Security Guard, Warden, Animal Husbandary Related,  Accountant, Plumber, Fitter, Mechanic, Turner, Sweeper, Barber, Tailor यासारख्या विविध पदांचा समावेश आहे. त्याकरिता बारावी, आयटीआय व डिप्लोमा उत्तीर्ण, पदवीधर व पदव्युत्तर  उमेदवारांची निवड करण्यांत येणार आहे. 12 वी पास उमेदवारांना दरमहा 6000/- आयटीआय पास रु. 8000/- व पदवी व पदव्युत्तर पास  रु.10000/- विद्यावेतन सहा महिन्यांसाठी दिले जाणार आहेत. उमेदवारांना सदर पदांकरीता अर्ज करण्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवरील  नोदणी करणे आवश्यक आहे. उमेदवारांच्या नोंदणीकरीता  सदर कॅम्पमध्ये उमेदवारांची निशुल्क नोंदणी करून देण्यांत येणार आहे. नोंदणीकरीता शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांनी आधार कार्ड, दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक कागदपत्रांच्या छायाप्रतीसह तहसिल कार्यालय मालवण येथे उपस्थित रहावे. ज्यांची ऑनलाईन वरील पोर्टलवर नोदणी झालेली आहे अशा उमेदवारांना ऑनलाईन संबंधित पदांकरिता Apply करून दिले जाईल. जिल्हयातील  व मालवण तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र युवक युवतींनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा या कॅम्पमध्ये उपस्थित राहून  लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार वर्षा झालटे यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!