मनीष दळवी : सिंधुदुर्गचे ज्युनिअर “सहकार महर्षी”

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष मनीष दळवी वाढदिवस विशेष

कुणाल मांजरेकर

पश्चिम महाराष्ट्रात सहकाराची पाळेमुळे फोफावली आहेत. पण दुर्दैवाने म्हणा अथवा राजकीय अनास्थेमुळे महाराष्ट्राच्या अन्य क्षेत्रात विशेषतः कोकणात सहकार म्हणावा तसा रुजला नाही. त्यामुळे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार रुजवण्यासाठी काही मोजक्या नेत्यांनी प्रयत्न केलेत, त्यातली आघाडीची नावं म्हणजे सहकारमहर्षी स्व. शिवरामभाऊ जाधव आणि सहकारमहर्षी स्व. डी. बी. ढोलम. या दोघांनी जिल्ह्यात सहकार वाढीसाठी जीवाचे रान केले. म्हणूनच सहकारमहर्षी म्हणून आजही त्यांची ओळख बनली आहे. जिल्ह्याचा पर्यायाने येथील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सहकाराशिवाय पर्याय नाही, हे ओळखून त्यांनी जिल्ह्यात सहकाराचा पाया रचला. यातूनच 1983 साली रत्नागिरी जिल्हा बँकेचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निर्मिती झाली. शिवरामभाऊ आणि डी. बी. ढोलम यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांना सधन करण्याचे काम त्यांनी हाती घेतले. पण याला गती मिळाली ती कोकणचे भाग्यविधाते म्हणून ओळख असलेल्या माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांच्या काळातच. जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने नारायण राणे यांच्या विचाराने चालणारी असली तरी जिल्हा बँकेमध्ये मात्र चित्र वेगळे होते. विरोधकांच्या ताब्यात असलेली जिल्हा बँक 2008 च्या दरम्यान नारायण राणे यांच्या विचारांकडे आल्यानंतर पहिले अध्यक्ष बनण्याचा मान राणे साहेबांनी डी. बी. ढोलम यांच्या सारख्या जाणत्या नेत्याला दिला. त्यानंतर नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची प्रगतीकडे वाटचाल सुरु झाली. अडीच – तीन वर्षांपूर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत येथील मतदारांनी राणे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात दिली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष पदाची जबाबदारी वेंगुर्ला येथील मनीष दळवी यांच्याकडे दिल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार तथा जिल्हा बँकेचे तज्ज्ञ संचालक नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेला नंबर वन बनवण्याचे काम मनीष दळवी यांनी केले आहे. अत्यंत कमी वयात जिल्ह्याच्या सहकाराचा गाढा अभ्यास करून जिल्हा बँकेच्या व्यवसायात कोट्यावधींचा नफा मिळवून दिल्याने “ज्युनिअर सहकार महर्षी” अशी त्यांची ओळख बनली आहे. समोर आलेल्या संकटांना, अडथळ्यांना आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अत्यंत शांततेत बाजूला करून मनीष दळवी यांनी स्वकर्तुत्वाने आपले नेतृत्व निर्माण केले असून सहकार क्षेत्रात विकासाची दूरदृष्टी ठेऊन मनीष दळवी आज जिल्हा बँक देश पातळीवर सहकार क्षेत्रात नावलौकिक करेल यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या यशाची चर्चा आज संपूर्ण महाराष्ट्रात होताना दिसते. राणे कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासू व आमदार नितेश राणे यांचे निकटवर्तीय म्हणून मनिष दळवी यांची विशेष ओळख आहे. सहकारातील या युवा नेतृत्वाचा आज 2 ऑगस्ट रोजी जन्मदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला आढावा…. 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी १३ जानेवारी २०२२ रोजी मनीष दळवी विराजमान झाले. आणि अवघ्या एका वर्षात जिल्हा बँकेच्या ठेवीत तब्बल ३२१ कोटींची वाढ झाली. नुकताच यावर्षी जिल्हा बँकेने यावर्षी तर ५७६७ कोटी इतका व्यवसायाचा टप्पा गाठला आहे. चालू आर्थिक वर्षात रु. ५५२ कोटी एवढी व्यवसायात वाढ झालेली असून जिल्हा बँक आता ६००० कोटींचा व्यवसायाचा टप्पा गाठण्याकडे घोडदौड करत आहे. इतकंच नव्हे तर जिल्हा बँक गुणात्मक दृष्टीने जिल्ह्यात नंबर वन वर नेण्यासाठी मनिष दळवी मेहनत घेत आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली जिल्हा बँकेने ‘आपली शेतकऱ्यांची बँक’ या ओळखीबरोबरच आता ‘डिजिटल जिल्हा बँक’ अशी आपली नवीन ओळख निर्माण केली आहे. डिजिटल व्यवहार, विकास संस्था सक्षमीकरण, लघु उद्योगांना चालना, नवउद्योजकांना भक्कम साथ देणारी जिल्हा बँक आज महाराष्ट्रात अग्रेसर ठरली आहे. मनीष दळवी यांची अभ्यासू वृत्ती व सहकार क्षेत्रात आजपर्यंत केलेली वाटचाल पाहता जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच बँकेला नंबर १ बनवण्यासाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व घटकांचा विचार करून विविध योजनांद्वारे उत्तमोत्तम बँकिंग सेवा देत जिल्हा बँक देत आहे. डिजिटल बँकिंग बरोबर शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी शेळीपालन, पोल्ट्री फार्म, पशुधन, वराह पालन, बायोगॅस, गोठा बांधणी, पडीक जमिनीवर लागवड होऊन ओलिताखाली क्षेत्र आणण्यासाठी स्वतंत्र कर्ज योजना, शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बळीराजा शैक्षणिक कर्ज योजना अशा प्रकारच्या विविध विविध योजनांच्या माध्यमातून इथला शेतकरी उभा राहावा असे ध्येय उराशी बाळगून मनिष दळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची वाटचाल सुरू आहे.  छोटे व्यवसाय, महिला गटांसाठी मायक्रो फायनान्स उपलब्ध करणे, घरपोच बँकिंग सेवा, जिल्हा बँकेच्या रिक्त जागांवर कर्मचारी भरती, नियमित कर्जफेड करणाऱ्यासाठी सवलती असे अनेक संकल्प सत्यात उतरवत जिल्हा बँक गतिमान वाटचाल करीत आहे.

विविध विकास संस्थांच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे. गाव, तालुका व जिल्हास्तरावरील सामाजिक कार्यात त्यांच्या असलेल्या सहभागामुळे पक्ष संघटना वाढीसाठी अधिक बळही मिळाले. जिल्हा बँकेवर अध्यक्ष म्हणून विराजमान झाल्यानंतर भाजप पक्ष व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्यावर ठेवलेला विश्वास सार्थकी लावत सामान्य शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय त्यांनी वेळोवेळी घेतले आहेत. शेतकऱ्यांसाठी असलेल्या विकास संस्था सक्षम होऊन कर्ज वाटप व वसुली अशा सर्वच बाबतीत त्या आघाडीवर राहिल्या पाहिजेत, असे त्यांचे ठाम मत आहे. जिल्ह्यातील विकास संस्थांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न असून केंद्र शासनाच्या सहयोगातून जिल्ह्यातील विकास संस्थांचे १०० % संगणकीकरण करण्याचे काम गतिमान करण्यात आले आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी जिल्हा बँकची सूत्र हाती घेतल्यापासून दरवर्षी ते विकास संस्थांसाठी तालुका स्तरावर कार्यशाळा घेऊन त्यांना प्रोत्साहिते  करत आहेत. याच विकास संस्थाच्या माध्यमातून गावागावात बँकिंग सुविधा शेतकरी वर्गाला मिळाव्यात यासाठी संस्थांना मायक्रो एटीएम् सुविधा त्यांनी सुरू केली आहे. संस्थांच्या कर्ज वसुलीला प्रोत्साहन देण्यासाठी बँक व संस्था पातळीवर १०० % कर्ज वसुली केलेल्या संस्थांचा सत्कार करत त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून मनिष दळवी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!