आमदार वैभव नाईक यांच्या वतीने मसुरे विभागात मोफत वह्यावाटप
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आ. वैभव नाईक आणि ठाकरे शिवसेना कटीबद्ध : हरी खोबरेकर यांचे प्रतिपादन
मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्यावतीने आणि ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून मसुरे येथील जिल्हा परिषद प्रशालेत शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी कांदळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कावा मसुरे, जिल्हा परिषद शाळा मसुरे देऊळवाडा, जिल्हा परिषद शाळा मालोंड, जिल्हा परिषद शाळा बेलाचीवाडी या शाळांमध्ये वह्या वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना उबाठा शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी शैक्षणिक साहित्य वाटपाची परंपरा गेली १५ वर्षे सुरू ठेवली असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये त्यांनी वह्या वाटप करून सहकार्य केले आहे. येथील विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन पुढे येण्यासाठी ठाकरे शिवसेनेचा नेहमीच प्रयत्न असतो. यापुढे सुद्धा आमदार वैभव नाईक आणि आम्ही सर्व शिवसैनिक येथील शैक्षणिक विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
यावेळी शिवसेना सोशल मिडिया तालुकाप्रमुख सिद्धेश मांजरेकर, विभाग प्रमुख राजेश गावकर, सरपंच रणजीत परब, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कदम, शाखाप्रमुख अमोल परब, शाखाप्रमुख जीवन कांदळगावकर, शाखाप्रमुख दीपक परुळेकर, नितीन परब, सागर कदम, रोहन राणे, महेश आयकर, शशांक माने, भरत राणे, युवतीसेना तालुका प्रमुख निनाक्षी मेतर, युवतीसेना विभाग प्रमुख आर्या गावकर, युवासेना उपविभागप्रमुख आयवान फर्नांडिस, मामी पेडणेकर, प्रचिती मसुरकर, अस्मिता मालवणकर, दिनेश बागवे, सुहास पेडणेकर, माजी सरपंच आदिती मेस्त्री, सौ. परब, सौ. बागवे, माजी शाळा समिती अध्यक्ष निलेश लाड, सुभाष बागवे, प्रसाद परब तसेच कांदळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १ या शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या मेथर, सहाय्यक शिक्षक बंडू राठोड आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कावा मसुरे या शाळेचे मुख्याध्यापिका मेहंदळे मॅडम उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा मसुरे देऊळवाडा या शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत पारकर, सौ.ताम्हणकर मॅडम, सौ.सापळे मॅडम आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा मालोंड येथील गोविंद परब, सुहास सुर्वे, दीपिका मेस्त्री, प्रमिला पांजरी, श्रद्धा घाडीगावकर, प्रेरणा पुजारे, प्रणाली घाडीगावकर अपूर्वा सारंग, स्मिता वाडकर, मोहिनी परब, योगिता पुजारी आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा बेलाचीवाडी येथील चंद्रकांत मिठबावकर, रमाकांत घाडीगावकर, भारती घाडीगावकर आणि उभाठा शिवसेनेचे पदाधिकारी ग्रामस्थ विद्यार्थी पालक होते.