घुमडाई मंदिरात ६ ऑगस्ट पासून “श्रावणधारा” अंतर्गत नामांकित बुवांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा
उद्योजक दत्ता सामंत पुरस्कृत आणि घुमडे ग्रामस्थ मंडळ आयोजित भजन स्पर्धेचे यंदा १० वे वर्ष
दर मंगळवारी रंगणार स्पर्धा ; विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम ; ३ सप्टेंबरला बक्षीस वितरण सोहळा
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील घुमडे येथे दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या “श्रावणधारा” कार्यक्रमा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते देवदत्त उर्फ दत्ता सामंत पुरस्कृत आणि घुमडे ग्रामस्थ मंडळ आयोजित भजन महर्षी कै. पंढरीनाथ घाडीगांवकर स्मृती प्रित्यर्थ नामांकित बुवांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा ६ ऑगस्ट पासून घुमडाई मंदिरात संपन्न होणार आहे. यंदा या स्पर्धेचे हे दहावे वर्ष असून दर मंगळवारी ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे. या निमित्त महिनाभर मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
मंगळवार दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. श्री भगवती प्रासादिक भजन मंडळ आंबेरी (बुवा अमित डिंचोलकर), सायंकाळी ६ वा. गांगेश्वर कृपा भजन मंडळ श्रावण (बुवा विश्राम घाडी), सायंकाळी ७ वा. श्री मुळपुरुष प्रासादिक भजन मंडळ वडखोल वेंगुर्ले (बुवा पुरुषोत्तम परब), रात्री ८ वा. चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ वायंगणी वेंगुर्ले (बुवा अनिकेत भगत) यांची भजने होणार आहे.
मंगळवार दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ वर्दे कुडाळ (बुवा अद्वैत पालव), सायंकाळी ६ वा. स्वर संगम प्रासादिक भजन मंडळ कासरल कणकवली ( बुवा अमोल चव्हाण), सायंकाळी ७ वा. श्री लक्ष्मी नारायण प्रासादिक भजन मंडळ वालावल कुडाळ (बुवा सूरज लोहार), रात्री ८ वा. श्री स्वामी समर्थ भजन मंडळ वेर्ले बांदा (बुवा अक्षय कांबळी) यांची भजने होणार आहेत.
मंगळवार दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. श्री दत्ताकृपा प्रासादिक भजन मंडळ वैभववाडी (बुवा विराज तांबे), सायंकाळी ६ वा. श्री देवी इस्वटी प्रासादिक भजन मंडळ मातोंड वेंगुर्ले (बुवा – सचिन सावंत), सायंकाळी ७ वा. श्री भगवती प्रासादिक भजन मंडळ बाव कुडाळ (बुवा लक्ष्मण नेवाळकर), रात्री ८ वा. श्री महापूरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी कुडाळ (बुवा प्रसाद आंबडोसकर) यांचे भजन होणार आहे.
मंगळवार दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. श्री पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ फोंडा घाट कणकवली ( बुवा हेमंत तेली), सायंकाळी ६ वाजता श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ माजगाव सावंतवाडी (बुवा कुणाल वारंग), सायंकाळी ७ वा. श्री नादब्रम्ह प्रासादिक भजन मंडळ कसाल (बुवा सुंदर मेस्त्री), रात्री ८ वाजता श्री देवी माऊली प्रासादिक भाजन सेवासंघ इन्सुली सावंतवाडी (बुवा वैभव राणे) यांची भजने होणार आहेत.
गुरुवार दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद होणार असून सायंकाळी ७ वा. “भीषण स्वरूपी राजयक्षमा” हा संयुक्त दशावतारांचा महान पौराणिक संघर्षमय दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. यामध्ये दिग्गज कलाकारांचा समावेश असेल.
मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार असून सायंकाळी ७ वाजता “चिंतामणी जन्म” हा संयुक्त दशावताराचा महान पौराणिक संघर्ष मय दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. यामध्ये देखील दिग्गज कलाकारांचा भरणा आहे. तरी श्री देवी घुमडाई मंदिरात होणाऱ्या या मंगल धार्मिक सोहळ्यास भाविक व भजन श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.