मसुरे मेढावाडी येथील बागवे कुटुंबीयांना शिवसेना ठाकरे पक्षाकडून आर्थिक मदतीचा हात

तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते मदत सुपूर्द

मालवण : मालवण तालुक्यातील सतत पडणाऱ्या पावसामुळे मसुरे येथील अनिरुद्ध बागवे यांच्या राहत्या घरावर झाड पडून मोठे आर्थिक नुकसान झाले. या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना मालवण उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व बागवे कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. तसेच शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यापुढील काळातही जमेल त्याप्रमाणे लोकांची सेवा अविरहित करत राहू असे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितले. संकटकाळी शिवसेना नेहमी सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते, हे आज दिसून आल्याने श्री.अनिरुद्ध बागवे यांनी शिवसेना परिवाराचे आभार मानले. 

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मसुरे विभागप्रमुख राजेश गावकर, उपविभागप्रमुख सुहास पेडणेकर, सिद्धेश मांजरेकर युवासेना उपविभागप्रमुख आयवान फर्नांडीस, दिनेश बागवे, युवतीसेना विभागप्रमुख आर्या गांवकर, मामी पेडणेकर, राजू सावंत, मधुरा दिनेश बागवे,अनिल बागवे, मकरंद वायंगणकर उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!