आभाळमाया ग्रुपचे पुन्हा एकदा दातृत्व ; कॅन्सरग्रस्त रुग्णाला ५० हजारांची आर्थिक मदत

मालवण : मालवण तालुक्यातील आभाळमाया या सेवाभावी संस्थेच्या वतीने नांदोस चव्हाणवाडी येथील रावजी चव्हाण या कॅन्सरग्रस्त रुग्णाला ५०,०००/- रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली

श्री. चव्हाण या कॅन्सरग्रस्त रुग्णाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. या पोस्टचा संदर्भ घेऊन चौकशी केली असता ते एक पूर्णतः निर्व्यसनी गृहस्थ असून दुर्धर आजच्या विळख्यात सापडल्याचे समजल्याने त्याना आर्थिक मदतीचे आवाहन आभाळमाया ग्रुपतर्फे करण्यात आले होते. त्यामुळे ग्रुपमधील दानशूर व्यक्तींच्या मार्फत मदत गोळा करून रावजी चव्हाण यांना मिरज येथे हॉस्पिटलमध्ये जाऊन देण्यात आली. त्यावेळी ग्रुप सदस्य समीर रावले, जगदीश परब, महेश परब, श्रीकांत शिरसाट उपस्थित होते. रावजी चव्हाण यांना समाजातील जास्तीत जास्त दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत द्यावी, असे आवाहन आभाळमाया ग्रुप संस्थापक राकेश डगरे यांनी केले आहे.

Reshma Ravji Chavan 

State Bank of India 

A/C 32586737652

IFSC code : SBIN0012213

Google pay : 9423273278

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!