आचरा येथे २ ऑगस्टला सहकार मेळावा ; भाजपा नेते निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती

मालवण तालुका खरेदी विक्री संघाचे आयोजन ; सहकारातील तज्ञांचे मिळणार मार्गदर्शन

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघांच्या वतीने शुक्रवार दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ वा. निलेश सरजोशी हॉल आचरा येथे सहकार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खा. निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

बदलते सहकार धोरण, सहकारातील संधी आपल्या भागातील शेतकरी, व्यवसायिक यांना बदलत्या व आधुनिक टेक्नॉलॉजीच्या जमान्यात सहकारी तत्वांचा योग्य समन्वय साधून सहकाराचा पर्यायाने स्वतःचा विकास करणे या उद्देशाने सहकारात कार्य करणाऱ्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना एकत्र करण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास सहकारातील तज्ञ व्यक्ती, व्यवसायातील मार्गदर्शक व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यास भाजपा नेते निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक निबंधक, मालवण राहूल शशिकांत पोवार, सहकार अधिकारी अजय हिर्लेकर, उदयोग व्यवस्थापन तज्ञ नंदकिशोर गोविंद परब उपस्थित राहणार आहेत. तरी सहकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर आणि संचालक मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!