दुसऱ्यांना संपवायची भाषा करणारा स्वतःच जास्त काळ टिकत नाही : निलेश राणे
सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर राजकीय टीका करणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा भाजपाचे कुडाळ मालवण विधानसभा समन्वयक निलेश राणे यांनी समाचार घेतला आहे. दुसऱ्यांना संपवायची भाषा करणारा स्वतःच जास्त काळ टिकत नाही, असे सांगून एक-दोन तालुक्यांमध्ये स्वतःचे समर्थक असले म्हणजे राज्याचा नेता किंवा समाजाचा नेता होता येत नाही. काही मराठा समाजाच्या तरुणांना माझी विनंती आहे, या माणसाबरोबर राहण्यात आता काही अर्थ नाही. आपल्या भविष्याचा विचार करा. कितीवेळा हा माणूस आंदोलन स्थगित करणार आणि पुन्हा सुरू करणार आणि पुन्हा तुम्हाला जमिनीवर बसवणार?? अशी पोस्ट निलेश राणे यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून केली आहे.