मालवण मधील मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ८५ जणांचा सहभाग

लायन्स क्लब मालवण, माय माऊली महिला सबलीकरण, पाटीदार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

लायन्स क्लब ऑफ मालवण , माय माऊली महिला सबलीकरण आणि पाटीदार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ८५ जणांनी या शिबिरात सहभाग घेतला.

दैवज्ञ भवन येथे मंगळवारी हे शिबीर घेण्यात आले. यात सीबीसी, थायरॉईड , रक्तातील साखर, Hb1c, महिलांसाठी कॅन्सर तपासणी करण्यात आली. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेश अंधारी, सेक्रेटरी फॅनी फर्नाडीस, खजिनदार पल्लवी खानोलकर, शांती दिवानी, उमेश शिरोडकर, जयश्री हडकर, अनुष्का चव्हाण, गणेश प्रभुलकर, मोहन पटेल, दिक्षा गावकर, अंजली आचरेकर , नंदिनी गावकर, वैशाली शंकरदास, मनाली दळवी, राधिका मोंडकर, मनीषा गावकर , उपस्थित होते. मायमाऊलीच्या अध्यक्षा फॅनी फर्नाडीस यानी पुढाकार घेऊन हे शिबीर यशस्वी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!